By  
on  

शाहिद कपूरची रावडी भूमिका असलेला 'कबीर सिंग' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये व्यसनात बुडालेला आणि थोडा विक्षिप्त असा शाहिद कपूर दिसून येत आहे.

हा सिनेमा तेलगूमधील सुपरहिट सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. या मूळ सिनेमात साउथ अभिनेता विजय देवराकोंडाने प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=162&v=RiANSSgCuJk

सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात आधी अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार होता. परंतु इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने रणवीरने या सिनेमाला नकार दिला. त्यामुळे रणवीर सिंगच्या जागी शाहिद कपूरची या सिनेमात एन्ट्री झाली. शाहिद कपूर याआधी 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमात दिसला होता. या सिनेमातर्फे शाहिद एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. संदीप वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंग' हा सिनेमा २१ जुन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive