By  
on  

पराभवानंतरही उर्मिला मांतोडकरने मानले तिला मतदान करणा-या मतदारांचे आभार

अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. पण तिला गोपाळ शेट्टींविरोधात पराभव पत्करावा लागला. पण उर्मिलाने या पराभवाला अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ उपलोड केला आहे. यात ती म्हणते, ‘आभार... माझ्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आणि मला मतदान केलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. माझ्या पराभवातही मला विजय दिसत आहे. मला मतदान केलेल्यांच्या सोबत मी कायम उभी राहीन. मी तुमची कधीच निराशा करणार नाही.’ पराभवानंतरही उर्मिला राजकारणात करीअर करणार आहे. उर्मिलाच्या मते, हा पराभव तिच्यासाठी एक विनम्र सुरुवात आहे.

https://www.instagram.com/p/Bx1ZmuzBAxW/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive