By  
on  

अभिनेता आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल 15' सिनेमाचा थरारक ट्रेलर पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणाचा लवकरच 'आर्टिकल 15' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाविषयी उत्सुकता जागवण्यासाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे सिनेमाचा ट्रेलरसुद्धा जबरदस्त आहे.

 

या ट्रेलरच्या सुरुवातीला मागे एक आवाज ऐकायला येतो. 'मी आणि आपण या लोकांना कधीही दिसणार नाहीत. हे कधी हरिजन होतात तर कधी बहुजन होतात. परंतु जन कधी होत नाहीत.' या आशयाचं वाक्य कोणतरी बोलत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये काही मृतदेह दिसून येतात आणि लगेचच पोलीस अधिकाराच्या दमदार भूमिकेत आयुष्मान खुराणाचा प्रवेश होतो. या ट्रेलरमध्ये जातीपाती आणि भेदभाव यांचा वारंवार उल्लेख आढळतो. 'आर्टिकल 15' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून हा ट्रेलर एक वेगळंच जग आपल्याला दाखवून आपल्याला विचार करायला भाग पाडतो.

https://www.youtube.com/watch?v=HKOJY0cU63E

या सिनेमात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत असून कुमुद मिश्रा, मोहम्मद झिशान, मनोज पाहवा आदी कलाकार सुद्धा या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा २८ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive