By  
on  

Exclusive: लहान मुलाशी असभ्य वागल्याने सलमानने लगावली सिक्युरिटी गार्डला झापड

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला लहान मुलांची किती आवड आहे हे सर्वांना माहीत आहे. सलमान खान आपल्या सोशलमिडीयावरून नेहमी लहान मुलांसोबतचे फोटो शेयर करत असतो. याच लहान मुलांसोबत कोणी दुर्व्यवहार केला तर मात्र भाईजानला सहन होत नाही.

अशीच काहीशी घटना आदल्या रात्री घडली. सलमान आपल्या भारत सिनेमाच्या प्रीमियरसाठी मुंबईतल्या पीव्हीआर फीनिक्स मॉल येथे पोहोचला. त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सने प्रचंड गर्दी केली. या सर्व गर्दीत एक छोटा सरदार मुलगा गर्दीमुळे सलमान पर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु पुढे पुढे येऊन सलमानला भेटण्याची त्याची धडपड मात्र चालू होती. अशातच सलमानच्या बॉडीगार्डने त्या छोट्या मुलाला जोरात धक्का देऊन त्याला मागे ओढलं. सलमानने हे पाहताक्षणी त्याला राग आला आणि त्याच रागाच्या भरात त्याने सर्वांसमोर आपल्या बॉडीगार्डला सणसणीत कानाखाली मारली.

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सलमान खानच्या एका चाहत्याने पिपिंगमुनला हा व्हिडिओ पाठवला. 'सलमानचं दिल खूप मोठं आहे,त्याचप्रमाणे भाईजानचा रागसुद्धा मोठा आहे', असं मत या चाहत्याने व्यक्त केलं. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे कि लहान मुलांप्रती सलमानला किती माया असून त्यांच्याशी कोणी गैरव्यवहार केल्यास सलमानला ते सहन होत नाही. सलमानचा भारत सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या सिनेमात सलमानसोबत तब्बू, दिशा पटनी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive