By  
on  

साजिद नाडियाडवालाच करणार 'किक 2' सिनेमाचं दिग्दर्शन

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची प्रमुख भूमिका असलेला 'किक 2' हा या सिनेमाच्या दिग्दर्शनाबद्दल अनेक बातम्या चर्चेत होत्या. या सिनेमाचा दिग्दर्शक बदलला असल्याची बातमी सुद्धा मध्यंतरी चर्चेत होती. परंतु प्रोडक्शनने आता नुकतंच एक ट्विट करून या सर्व बातम्यांमध्ये काही तथ्यता नसल्याचं सांगितलं आहे. 

'नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट' सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून ''आम्ही त्या सर्व रिपोर्ट्सचं खंडन करतो ज्यांनी 'किक 2' चा दिग्दर्शक बदलला असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. हा सिनेमा अजूनही आमच्या प्रोडक्शनकडे असून या सिनेमाला साजिद नाडियादवाला दिग्दर्शित करणार आहेत.''

 

साजिद नाडियाडवाला यांच्यातर्फे जेव्हापासून 'किक 2' या सिनेमाची घोषणा झाली होती, तेव्हापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टीने या सिनेमाची पटकथा लिहिण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून साजिद नाडियाडवाला या सिनेमाच्या पटकथेवर काम करत असून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे. 

या सिनेमाचा पहिल्या भागाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होत. त्यामुळे दुसरा भाग सुद्धा मनोरंजनाने परिपूर्ण बनवण्यावर लेखक आणि निर्माते प्रयत्नशील आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive