By  
on  

‘83’च्या सेटवर सहनिर्माती दीपिकाची एंट्री, रणवीरने केलं स्वागत

दीपिका रणवीर एकमेकांसोबत असण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता दोघंही एका सिनेमात झळकणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे आता रील लाईफमध्येही पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका रणवीर कबीर खानच्या ‘83’मध्ये झळकणार आहेत. आम्ही तुम्हाला यापुर्वीच सांगितलं होतं की रणवीर सिंग कबीर खानच्या ‘83’मध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आता दीपिकाचं या सेटवर आगमन झालं आहे. रणवीरने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर दीपिका आणि कबीर खान यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला रणवीरने कॅप्शन देताना रणवीर म्हणतो, ‘माझ्या पत्नीची भूमिका, माझ्या पत्नीशिवाय आणखी चांगली कोण साकारु शकतं?’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Good times in Glasgow! #83squad @83thefilm @deepikapadukone @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

कपिलची पत्नी रोमी देवची व्यक्तिरेखा दीपिकानेच साकारावी असा आग्रह कबीर खान यांचा कधीपासूनचा होता. पण दीपिका मेघना गुलजारच्या ‘छ्पाक’मध्ये बिझी असल्याने तिने या सिनेमासाठी होकार कळवला नव्हता. दीपिका या सिनेमात काम करणार आहेच. पण ती या सिनेमाची सहनिर्मातीदेखील असणार आहे. छपाक नंतर दीपिका सहनिर्माती असलेला हा दुसरा सिनेमा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive