By  
on  

अंगावर शहारे आणणारा ‘साहो’चा अ‍ॅक्शनपॅक्ड टीजर पाहिलात का?

बहुचर्चित बहुप्रतिक्षित ‘साहो’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पडत आहे. या टीजरमध्ये अनेक अ‍ॅक्शन सीन आहेत. श्रद्धा आणि प्रभास यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे हे कलाकार देखील आहेत.

 

टीजरच्या सुरुवातीलाच श्रद्धाचा गोड चेहरा समोर येतो. काहीशा रोमॅंटिक पीचवर हा सिनेमा जातोय असं वाटतानाच धुवांधार अ‍ॅक्शनला सुरुवात होते. चंकी पांडेची या सिनेमात काहीशी नकारत्मक भूमिका असेल असं टीजर बघताना वाटतं. हिदींसोबतच हा सिनेमा तेलुगू, तमिळमध्ये डब होणार आहे. सुजीत या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. हा सिनेमा १५ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे.  

Recommended

PeepingMoon Exclusive