कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर ह्या दिवशी भारतात परतणार ऋषी कपूर, जाणून घ्या सविस्तर

By  
on  

बॉलिवूडची अनेक दशकं गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके सुपरस्टार ऋषी कपूर हे गेले कित्येक महिने अमेरिकेत कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत असल्याचे आपण सर्वच जाणतो.1 मे रोजी फिल्ममेकर राहुल रवैल यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऋषी कपूर हे कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्या ह्या कठीण काळात सिनेविश्वातील अनेक त्यांच्या आप्त-स्वकीयांनी गाठी-भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवले. त्यांना ज्यामुळे बरं वाटेल अशा गोष्टी केल्या. ह्या त्यांच्या कठीण प्रसंगात त्यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर आणि मुलगा अभिनेता रणबीर कपूर हे खंबीरपणे त्यांच्यासोबत होते. 

मागच्या महिन्यात म्हणजेच 30 मे रोजी ऋषी कपूर हे मायदेशी परतण्याच्या आठवणीने व्याकूळ झाले होते आणि त्यांनी ट्विट करत एक प्रश्न स्वत:लाच केला,'आज न्यूयॉर्कमध्ये मला आठ महिने झाले आहेत, मी घरी कधी परतणार?'.परंतु आता नुकत्याच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार असून ते आपल्या कुटुंबियांसोबत आपला 67 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत संपर्क साधला आणि ते आता लवकरच भारतात परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ऋषी कपूर हे भारतात येणार असून मी आधीपेक्षा जास्त स्वत:ला तंदुरस्त जाणवतो आहे आणि घरी परतुन मी पूर्णत:च बरा होईन असं ऋषी कपूर म्हणाले. 

 

 

Recommended

Loading...
Share