By  
on  

अखेर ठरलं तर! 'लाल सिंग चड्ढा' मध्ये आमिर खान सोबत झळकणार अभिनेत्री करीना कपूर खान

आमिर खानने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आगमी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची घोषणा केली होती. हॉलिवूडमधील लोकप्रिय 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा हा अधीकृत रिमेक असणार आहे.  'व्हायकॉम 18' या सिनेमाची निर्मिती केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाशी संबंधीत एक मोठी खबर समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार आमिर खान सोबत या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर खान झळकणार आहे. आमिर खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर आणि करीना तिसऱ्यांदा सोबत काम करत आहेत. आमिर आणि करीना याआधी 3 इडियट्स' आणि 'तलाश' सिनेमांमध्ये एकत्र झळकले असून या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

'लाल सिंग चड्ढा' हा सिनेमा अतुल कुलकर्णी लिहीतअसून 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. 2020 च्या क्रिसमसमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive