म्हणून 'सूर्यवंशी'च्या शूटींगदरम्यान अक्षय कुमारने घेतला दोन दिवसांचा ब्रेक

By  
on  

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटींगमध्ये सध्या जबरदस्त बिझी आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण नुकत्याच एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार अक्षय कुमारने सूर्यवंशीच्या शूटींगमधून दोन दिवसांचा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे.कोणत्याही खासगी कामासाठी किंवा हॉलिडेसाठी अक्षयने हा ब्रेक अजिबातच घेतलेला नाही, तर या वृत्तानुसार आपली कॉमेडी फ्रेंचायझी फिल्म हाऊसफुल 4 च्या एका गाण्याच्या शूटींगसाठी हा खास ब्रेक त्याने घेतल्याचे समजते. 

अक्षय कुमारच्या या गाण्याबाबत अधिक सविस्तर बोलायचं झालं तर, मुंबईतील सिटी स्टुडिओमध्ये या गाण्याचं शूटींग पार पडणार असून जवळपास 300 डान्सर्स बॅंकग्राऊंडला नाचणार आहेत, तसंच या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे, यात अक्षयसोबत अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीचासुध्दा डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. 

अक्षय आणि नवाजुद्दीन सिध्दीकीच्या या स्पेशल सॉंगला प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य कोरिओग्राफ करणार आहेत. अक्षय आणि गणेश यांनी आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड गाणी गाजवली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गणेशजींनी डान्सर्ससोबत आधीच रिहर्सल सुरु केली असून अक्षय 28 आणि 29 जूनला या गाण्याचं शूटींग करेल. 

 

 

Recommended

Loading...
Share