खिलाडी अक्षयने रोखली त्याच्या स्टंट प्रक्षिशकावर बंदूक, काय झालं नेमकं?

By  
on  

अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीच्या बहुचर्चीत 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अक्षय कुमार खूप दिवसांनी ऍक्शनपॅक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक फोटो अक्षय सोशलमीडियावर पोस्ट करत असतो. 

नुकताच अक्षयने एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करुन या फोटोमध्ये अक्षय आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीचा एक वेगळा स्वॅग बघायला मिळत आहे. अक्षय रोहितसह सिनेमाशी संबंधित सर्व कलाकार एका दिशेने बंदूक रोखून निशाणा साधत आहेत. ज्या माणसावर निशाणा साधत आहेत त्याचा चेहरा मात्र दिसत नाही.''जेव्हा सर्व ऍक्शन दृश्य करून संपतात तेव्हा फक्त फाईट मास्टरला मारणं बाकी असतं'' असं कॅप्शन अक्षयने या फोटोखाली लिहिलं आहे. 

 

या हटके फोटोआधी काही दिवसांपूर्वीअक्षयचा कतरिना कैफबरोबरचा एक फोटो वायरल झाला होता. या फोटोच्या माध्यमातून 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट होण्याची माहिती अक्षयच्या चाहत्यांना मिळाली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Singing in the rain ️ #sooryavanshi @akshaykumar @itsrohitshetty @farahkhankunder

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ प्रमुख भूमिकेत असून हा सिनेमा २७ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share