By  
on  

सलमान खानच्या 'नच बलिये 9' चा प्रीमियर सलग तीन दिवस पाहायला मिळणार?

सुपरस्टार सलमान खान 'नच बलिये 9' या रिऍलिटी शो ची निर्मितीची धुरा सांभाळत आहे. या सिजनमध्ये पाच एक्स कपल्स आणि पाच सध्याचे कपल्स हा शो जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत. एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार सलमान खान निर्मित 'नच बलिये 9' चा प्रीमियर सलग तीन दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

सूत्रांच्या महिनीनुसार 'नच बलिये 9' साठी एक हटके संकल्पना ठेवण्यात आली आहे ज्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच 'नच बलिये' इतिहासात पहिल्यांदाच एका सिजनचा प्रीमियर तीन दिवस दाखवण्यात येणार आहे. तसेच या सिजनमध्ये शोच्या फॉरमॅट मध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले आहेत. 

 

 

'नच बलिये 9' सिजनच्या सुरुवातीच्या भागांमध्ये सलमान खान स्वतः शोमधील स्पर्धकांची ओळख करून देणार आहे. या सिजनमधे बहुचर्चित कपल्स गाण्यांच्या तालावर थिरकताना दिसणार आहेत. 

सलमान खान सध्या 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  हा सिनेमा २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच 'दबंग 3' नंतर सलमान 'इन्शाअल्लाह' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive