By  
on  

सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा देत रितेश देशमुख म्हणतो....

देशाच्या माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झालं. त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागल्.याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. कर्तव्यनिष्ठ आणि करारी बाण्याच्या नेत्या असं बिरुद त्या मिरवायच्या. देशाच्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी देश हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतेले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना आदरांजली वाहिली. अभिनेता रितेश देशमुख याने सुषमा स्वराज यांच्या आठवणी जागवत ट्विटरवरुन त्यांना उजाळा दिला. 

 रितेश देशमुख ट्विट करत म्हणतो, "मला सुषमाजींना भेटायला मिळण्याचं भाग्य लाभलं. २००३ साली रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तुझे मेरी कसम’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं तेव्हा रामोजी फिल्म सिटीत शूटींग सुरु होतं. त्यावेळी त्या योगायोगाने तिथे होत्या त्या आवर्जून आम्हा दोघांना भेटल्या आणि आम्हाला आमच्या बॉलिवूड करिअरच्या वाटचालीसाटी खुप सा-या शुभेच्छा देत आशिर्वाद दिले. तो आम्हा दोघांचाही पहिलाच सिनेमा होता. धन्यवाद सुषमा स्वराज, मॅडम. " 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive