By  
on  

'मरजांवा' सिनेमातून रितेश देशमुखचा लुक आला समोर, ह्य दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'एक व्हिलन'नंतर अभिनेता रितेश देशमुख आणि सिध्दार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकणार आहेत. ही जोडी आता पुन्हा एकदा मिलाप झवेरीचा सिनेमा 'मरजांवा' मध्ये एकत्र झळकणार आहे. ह्या सिनेमातला रितेश देशमुखचा नवा अवतार नुकताच समोर आला आहे. ह्यात तो एकदम दाक्षिणात्य इसमाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. लांब दाढी लांब वाढलेले केस अशा अवतारात रितेश खुपच हटके दिसतोय. 

'मरजांवा' ह्या सिनेमात रितेश देशमुख एक खलनायक साकारतोय. सिध्दार्थ मल्होत्रा आणि रितेशच्या व्यक्तिरेखांमध्ये सिनेमात चकमक पाहायला मिळणार आहे. अॅक्शन, रोमान्स आणि स्सपेन्सने भरपूर असलेल्या रितेशच्या ह्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी 'मरजांवा' प्रदर्शित होत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive