शाहीद कपूर आता कबीर सिंगनंतर आपला पुढचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तेलुगू सिनेमा 'जर्सी'चा हिंदी रिमेक घेऊन शाहीद प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ह्या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच उलगडला. शाहिद सिनेमात एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे मिडीया रिपेर्टनुसार 'कबीर सिंग'च्या यशानंतर शाहीदने या सिनेमासाठी आपल्या मानधनात वाढ करुन बरीच मागणी केली होती. जर्सीच्या मेकर्सनी शाहीदला 35 कोटींचं मानधन देऊ केल्याचं बोललं जात आहे. तसंच सिनेमाशी संबंधित ट्रेड एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार शाहीद या सिनेमाच्या प्रॉफीटचा 30 टक्के शेयरसुध्दा घेणार आहे.
'जर्सी' सिनेमाबाबत बोलायचं झालं तर शाहीद ह्या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक असून त्याला मूळ तेलुगू सिनेमासुद्दा खुप भावला आहे. आता शाहीद स्टाईलचा 'जर्सी' पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर झाले आहेत.