By  
on  

लता मंगेशकर यांना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्जार्च, ट्विटरवरुन मानले आभार

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना 28 दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.त्यानंतर त्यांनी घरी आल्यावर ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. तसंच आपण सुखरुप असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली आहे. 

लता मंगेशकर यांना श्वसनाच्या त्रासामुळे 12 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते. “नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांची मी पुन्हा मनापासून आभार आहे. हे प्रेम आणि आशिर्वाद असाच रहावा,”

 

लता दीदी यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरचेही आभार मानले आहेत. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive