पाहा Trailer : अजय देवगण स्टारर 'तानाजी द अनसंग वॉरियर'चा झंझावात आता मराठीत

By  
on  

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आता आपली मयबोली मराठी भाषेत सिनेरसिकांच्या दिमतीला आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण स्टारर आणि ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित  'तानाजी द अनसंग वॉरियर'चा हिंदी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि काही तासांतच प्रेक्षकांना आणि नेटक-यांना तो प्रचंड भावला. त्यामुळे सर्वांनाच हा सिनेमा कधी प्रदर्शित होतोय याची उत्सुकता लागुन राहिली. 

तसंच तानाजीमध्ये शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव हे मराठमोळे  कलाकार आपली छाप पाडताना दिसत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवानगी दिल्याने 'तानाजी द अनसंग वॉरियर' हा सिनेमा मराठीत येण्यासही सिद्ध झाला आहे. तानाजीचा मराठीतील टीजर नुकताच रिलीज झाला होता. आता तानाजींच्या  शौर्याला मराठीची दमदार साथ लाभल्याने तो अधिक परिणामकारक वाटतो आहे आणि आपल्या मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा सिनेमा आहे हे हा ट्रेलर पाहून लक्षात येते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तानाजीचं कौतुक करत हा सिनेमा हिंदीसोबत मराठीमध्येही डब करायला परवानगी दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या छातीचे शिलेदार तानाजींचा पराक्रम प्रत्येकापर्यंत पोहोचावा अशी भावना अमेय यांनी यावेळी व्यक्त केली होती. 

अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय तर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारतेय. काजल प्रथमच मराठमोळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सैफ अली खान सुद्धा खलनायकाच्या म्हणजे किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे. 

 

पाहा ट्रेलर 

 

 

 

 

ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

 

Recommended

Loading...
Share