By  
on  

ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहमसोबत काम केलेल्या या अभिनेत्याचं निधन

छोट्या पडद्यावरील अभिनेता कुशल पंजाबीचं वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण टीव्ही  इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या बातम्यांनी सध्या जोर धरला आहे. 

अधिक तपासानंतरच कुशलच्या मृत्यूचं गुढ उकलेल. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे मित्र होते. 

वांद्रे पाली हिल येथील घरात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. कुशल याचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली असून यासाठी कुणाला जबाबदार धरू नये असे कुशल याने नमूद केले आहे. वांद्रे पश्चिमेकडील आलसीद बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुशल राहत होता. 

कुशलने 2015 मध्ये आपल्या युरोपियन गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना एक मुलगा आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मिडीयावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive