एका धक्कादायक बातमीने नुकतीच मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. तुम्हालाही ती वाचून नक्कीच धक्का बसेल. केरळ येथे राहणा-या 45 वर्षीय महिलेने चक्क प्रसिध्द पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल या माझी आई असल्याचा चक्क दावा केला आहे. या 45 वर्षीय महिलेचं नाव करमाला मॉडेक्स असून तिने तिरिवनंतपुरमच्या फॅमिली कोर्टात 67 वर्षीय अनुराधा पौडवाल यांच्या विरोधात केस फाईल करुन 50 कोटींचा दावा ठोकला आहे.
करमालाच्या म्हणण्यानुसार, तिचा जन्म 1974 साली झाला. जेव्हा ती चार दिवसांची होती तेव्हा अनुराधाने तिला पोंनाचन आणि अॅग्नेस यांना सांभाळण्यासाठी सोपवून दिलं, कारण त्यावेळेस अनुराधा या पार्श्वगायिका म्हणून उदयास येत होत्या. त्यांच्या करिअरसाठी तो फार महत्त्वाचा काळ होता आणि तेव्हा त्यांना बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती.
करमालाने पुढे स्पष्ट केले, " पाच वर्षांपूर्वीच तिचा सांभाळ करणा-या पोंनाचन यांनी तिला अनुराधा यांच्याबद्दलचं सत्य तिला सांगितलं. तेव्हा तिला समजलं की, अनुराधा ही तिची बायोमेट्रीक आई आहे. ते अनुराधाचे जवळचे मित्र होते. अनुराधा जेव्हा संगीत क्षेत्रात व्य्सत होती, तेव्हाच तिने पोंनाचन यांच्याकडे करमालाला सोपविलं."
हे सर्व सत्य जाणल्यानंतर करमालाने अनेकदा अनुराधा यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा सतत प्रयत्न केला. परंतु समोरुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर अनुराधा यांच्याकडून करमालाचा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे. जर अनुराधाने करमालाचा दावा फेटाळून लावला तर तिच्या वकिलांनी डीएनए टेस्टची मागणी केली ाहे.