'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घौडदोड सुरुच

By  
on  

छत्रपती सिवाजी महाराजांचे शूर शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. तमाम सिनेरसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर आपली यशस्वी घौडदोड सुरुच ठेवली आहे. 

'तानाजी- द अनसंग वॉरियर'  १४ दिवसांमध्ये १९२ कोटी २८ लाख रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले आहेत. दुस-या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत तानाजीने स्थान पटकावले आहे. 

मराठमोळा बाज असलेला हा सिनेमा ट्रेलरपासूनच रसिकांच्या पसंतीस उतरला होता. हा सिनेमा मराठीमध्येही डब झाल्याने मराठी सिनेप्रेमींमध्ये आनंदाला उधाण आलं. ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर'  मध्ये अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकली. महाराष्ट्रात तर हा सिनेमा आता टॅक्स फ्री आहे. 

Recommended

Loading...
Share