अवघ्या सिनेसृष्टीवर आपल्या रंगभूषेच्या किमयेने चार चॉंद लावणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी दादा जुकर यांच्या निधनाने शोककळा पसरलीय. ते 88 वर्षांचे होते. सर्वच दिग्गजांना त्यांनी आपल्या रंगभूषेने खुलवलंय. दिलीपकुमार यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वांनाच. आयुष्याची 60 वर्षे रंगभूषेसाठी अविरत झटणारे पंढरी जुकर हे पंढरीदादा म्हणून ओळखले जायचे.
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा पंढरी दादांच्या खास आठवणींना उजाळा दिला आहे. बिग बी सोशल मिडीयावर त्यांच्या आठवणींची एक खास पोस्ट करत म्हणतात, "अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्तान’ याची शूटिंग गोव्यात सुरू होती. त्यावेळी मला पंढरी दादांच्या मेकअपनेच खुलवलं. भूमिकेनुसार बिग बींना दाढी लावायची होती. एकदा बिग बींच्या मेकअपनंतर पंढरी दादांना काही कामानिमित्त गोव्याहून मुंबईला परतावे लागले होते. तेव्हा पंढरीदादा पुन्हा गोव्यात येईपर्यंत आठवडाभर बिग बींनी तोंडच धुतलं नाही, कारण शुटींग सुरुच होतं आणि दाद नव्हते.त्यामुळे दादा .येईपर्यंत मला तसंच राहणं भाग होतं."
नर्गिसपासून माधुरी दीक्षित यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींचं सौंदर्य त्यांनी खुलवलं. नर्गिस यांनी त्यांचं मेक अप कौशल्य पाहून त्यांना परदेशी जाऊन अॅडव्हान्स मेक अप ट्रेनिंग घेण्यास मदत केली होती. यश चोप्रांच्या जवळपास सगळ्याच सिनेमात पंढरी दादा यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं आहे.