Video : मिलिंद सोमणची आई शोभते, सूने सोबत खेळली लंगडी

By  
on  

मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमणचा फिटनेस आणि त्याच्या फिटनेसबद्दलच्या इतर अॅक्टीव्हीटीजबदद्ल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मिलिंद जितका फिटनेस फ्रिक आहे तितकीच त्याची २८ वर्षीय पत्नी अंकीतासुध्दा आहे. हे दोघंही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. कधी लिप लॉक करताना, तर कधी योगसनांचा हटके प्रकार तर कधीतरी भटकंती करताना त्यांचा रोमान्स उतू जात असल्याचं पाहायला मिळतं. 

मिलिंद सोमणचा जसा उत्साह आहे. तसाच त्याच्या आईचासुध्दा ८९ व्या वर्षी थक्क करणारा उत्साह आहे.  मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याची पत्नी अंकिता व आई उषा सोमण हे लंगडी खेळताना पाहायला मिळतायत. 

एकीकडे २८ वर्षांची पत्नी व दुसरीकडे ८१ वर्षांची आई, या दोघी मिळून नेटकऱ्यांचा फिटनेसचं महत्त्व समजावून सांगत आहेत. मिलिंदने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उषा सोमण यांचा हा उत्साह खरंच वाखाणण्याजोगा असल्याचं म्हणत नेटक-यांनी कौतुक केलं आहे. 

Recommended

Loading...
Share