सध्या लॉकडाऊनमुळे काय काय पाहावं लागणार आहे याचा काहीच नेम नाही. करोनाचा विळखा देशभरात आणखी घट्ट होत असताना नागरिकांना घरात राहा सुरक्षित राहा सांगण्यासोबतच स्वच्छतेचं योग्य महत्त्वसुध्दा पटवून देण्याची गरज भासतेय. यासाठी बॉलिवूडचा दबंग सलमान खाननेच पुढाकार घेतला आणि चक्क एक व्हिडीओ प्रदर्शित केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुध्दा खळखळून हसाल.
सलमान खानने चक्क त्याचा मैने प्यार किया या त्यच्या आणि भाग्यश्रीच्या सुपरहिट सिनेमातील ऑयकॉनिक किसींग सीन रिक्रिएट केला..तुम्हालाही प्रश्न पडला असेल. कसा बरं केला असेल रिक्रिएट...तर हा व्हिडीओ सुरु होतो, त्यात मैने प्यार किया मधला सीन असतो, ज्यात लिपस्टीकच्या काचेवरील डागांना सलमान किस करतो आणि पुढे व्हिडीओ सुरुच असतो आणि त्यात आत्ताचा सलमान येतो व ते लिपस्टिकचे डाग लिक्वीड क्लिनरने फुसून टाकतो....हसू आवरताच येणार नाही.. तुम्हालाही हा धम्माल व्हिडीओ नक्कीच आवडेल यात शंका नाही.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती करण्यासोबतच सलमानने या करोना संकटाशी लढताना मदतीचा हातही पुढे केला आहे. या दरम्यान हातावर पोट असणा-या २५,००० कामगारांना सलमानने आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये त्याने पैसे पाठवले आहेत.