By  
on  

अभिनेता इरफान खान यांचं निधन, बॉलिवुडवर शोककळा

अभिनेता इरफान खानवर मुंबईतली कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची ही झुंज संपवून त्याने अखेरचा श्वास घेतला.

इरफान खानला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्याला चक्कर येऊन तो बाथरुममध्ये कोसळला असल्याचही वृत्त समोर आलं होतं. मात्र श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात  आलं होतं. मात्र इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवुडने आणि या देशाने एक हरहुन्नरी अभिनेता गमावल्याचं दु:ख सगळ्यांना आहे. बॉलिवुडकरांनी ट्विटरवर इरफानच्या जाण्यानं शोक व्यक्त केलं आहे आणि त्याच्या या लढ्याला सलाम केलय.

 

दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2018मध्ये इरफानला त्याला त्याच्या आजाराविषयी कळालं होतं. त्याला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाल्याचं त्याने सांगीतलं होतं. आणि 2019मध्ये उपचार करून इरफान भारतात परतला होता. 

Recommended

PeepingMoon Exclusive