अखेर आलिया भटने असं व्यक्त केलं दु:ख, केले रणबीर आणि ऋषी यांचे हे फोटो पोस्ट

By  
on  

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाकूळ वातावरण आहे. यासह कपूर परिवारावरही दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कपूर परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती. मुलगा रणबीर कपूरसह आलिया भटही यावेळी हजर होती. आलियालाही यावेळी अश्रू अनावर झाले होते. 
मात्र हे दु:ख आता आलियाने तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आलिया आणि रणबीर कपूर गेली काही वर्षे डेट करत असून आलिया ही रणबीरच्या परिवाराचाच एक भाग झाली आहे. ऋषी कपूर यांची प्रकृती जेव्हा केव्हा बिघडायची तेव्हा आलियाही रणबीरसोबत हजर असायची. आणि यामुळेच आलियाचही ऋषी कपूर यांच्यासोबत एक खास नातं तयार झालं होतं. याच नात्याविषयी आलिया या पोस्टमध्ये लिहीते.

आलिया या पोस्टमध्ये म्हणते की, “ मी या सुंदर माणसाविषयी काय सांगू ? ज्यांनी माझ्या आयुष्यात खूप प्रेम आणलं. ते आहेत लेजंट ऋषी कपूर. मागील दोन वर्षे मी त्यांना एका मित्राप्रमाणे,  ज्यांना चायनिज फूड आवडतं, जे एक सिनेमाप्रेमी आहेत, जे एक लढाऊ व्यक्ती आहेत, सुंदर कथा सांगणारे आहेत, ट्विटरची आवड असणारे आणि एक वडिल असचं पाहतेय मी त्यांना. मी या विश्वाला धन्यवाद करते की ज्याने मला त्यांना जाणून घेण्याची संधी दिली. आज बहुतांश लोकं त्यांना परिवार असल्याचं म्हणत असतील कारण त्यांनी तुम्हालाही असचं परिवारासारखं वागवलं असेल. माझं खूप प्रेम ऋषी अंकल.  तुमची नेहमीच आठवण येईल.”
असं म्हणत आलिया व्यक्त झाली. शिवाय तिने काही फोटोही पोस्ट केले आहेत. रणबीर कपूरचा ऋषी यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो तिने पोस्ट केला आहे. नितू कपूर आणि ऋषी यांचा जुना फोटोही आलियाने पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

beautiful boys

Recommended

Loading...
Share