By  
on  

 बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या 23 वर्षीय व्यक्तिला झाला कोरोना, जान्हवी-खुशी कपूर आणि इतर ठीक असल्याचे बोलले बोनी

फिल्म निर्माते बोनी कपूर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एक महत्त्वाची माहिती सांगीतली आहे. बोनी कपूर आणि परिवार राहत असलेल्या लोखंडवाला कॉम्पेल्कमधील घरात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय व्यक्तिची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्या व्यक्तिची प्रकृती शनिवारपासून बरी नव्हती, ज्यानंतर बोनी यांनी त्याला टेस्ट करण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर त्या व्यक्तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या व्यक्तिला लगेचच क्वारंटाईन सेटंर पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Staying at home is still the best solution we have. Stay safe everyone

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 यावर बोनी यांनी स्टेटमेंट दिलं आहे की, “आम्ही सगळे घरी ठीक आहोत. आणि आमच्यापैकी कुणामुध्येच काही लक्षणे नाहीत. एवढच नाही तर आम्ही लॉकडाउन सुरु झाल्यानंतर घराच्या बाहेरही पडलो नाही. आम्ही महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीने जलद प्रक्रिया केल्याने तुमचे आभार.”
पुढे बोनी म्हणतात की, “आम्ही बीएमसी आणि त्यांच्या मेडिकल टीमने दिलेल्या सुचना आणि नियमांचं पालन करतोय. आम्हाला विश्वास आहे की ती व्यक्ती म्हणजे चरण हा लवकरच बरा होईल आणि पुन्हा आमच्या घरी परतेल.”
या स्टेटमेंटमधून बोनी यांनी ते, मुली आणि घरातली सगळी मंडळी बरे असल्याचं सांगीतलं आहे.  बोनी यांची मुलगी जान्हवी कपूरने बोनी यांचे स्टेटमेंट तिच्या सोशल मिडीया अकाउंटच्या माध्यमातून पोस्ट केले आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive