By  
on  

‘लपाछपी’ सिनेमाचा येणार हिंदी रिमेक, सिनेमात झळकणार नुसरत भरुचा

अभिनेत्री नुसरत भरुचा ही जास्तीत जास्त रॉम-कॉम सिनेमांमधून पाहायला मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री आता एका हॉरर सिनेमातही दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमानंतर नुसरतच्या आगामी प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. आणि याच आगामी सिनेमाविषयीची माहिती समोर आली आहे. नुसरत ही एका हॉरर सिनेमात मुख्य  भूमिकेत झळकणार आहे. 'छोरी' असं या सिनेमाचं नाव आहे. ‘लपाछपी’ या विविध पुरस्कारांचा वर्षाव झालेल्या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. नुकताच याचा लोगो पोस्टरही प्रदर्शित झाला आहे.

प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस क्रिप्ट टिव्ही प्रोडक्शन हाउससोबत काम करण्याची संधी या निमित्ताने नुसरतला मिळणार आहे. क्रिप्ट टिव्ही अंतर्गत तयार झालेले सिनेमे हे प्रसिद्ध असून हॉरर प्रोजेक्टसाठी हा प्रोडक्शन हाऊस प्रसिद्ध आहे. आणि आता हे प्रोडक्शन बॉलिवुडमध्ये येत आहे. 

 

 

2017मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लपाछपी' या मराठी सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. शिवाय या सिनेमावर पुरस्कारांचा वर्षावही झाला. अभिनेत्री पूजा सावंत या सिनेमात मुख्य भूमिकेत होती. तिच्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं. 'लपाछपी'चे दिग्दर्शकच 'छोरी' सिनेमाचं देखील दिग्दर्शन करत आहेत.


'लपाछपी' प्रमाणे 'छोरी' या सिनेमातही मुख्य़ भूमिका साकारणाऱ्या नुसरतवर हा सिनेमा चित्रीत होईल. नुकतच नुसरतने ट्विट करून या सिनेमाविषयीची माहिती दिली आहे.

 

नुसरतच्या चाहत्यांसाठी तिला या नव्या सिनेमाच्या रुपात पाहणं रंजक ठरेल. शिवाय आगामी काळात नुसरत ‘छलांग’ मध्ये झळकेल ज्यात ती अभिनेता राजकुमार रावसोबत दिसेल. आणि ‘हुडदंग’ या सिनेमात ती सनी कौशलसोबत दिसेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive