By  
on  

गायिका शाल्मली खोलगडेने वाजिद खान यांना अशी वाहिली श्रध्दांजली

संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने कला विश्वात शोककळा पसरली आहे. संगीत विश्व तर मोठ्या धक्क्यात आहे. वाजिद खान यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली जात आहे.
गायिका शाल्मली खोलगडे ने देखील वाजीद खान यांना श्रध्दांजली वाहिली आहे. शाल्मलीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शाल्मली “शायराना” हे गाणं गात आहे. ‘दावत-ए-ईश्क’ या सिनेमासाठी शाल्मलीने हे गाणं गायलं होतं. या गाण्यासाठी साजीद-वाजिद जोडीनं  संगीत दिलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I’m indebted to you for showing faith and so much love in the little time we spent together. Rest in peace. X

A post shared by Shalmali (@shalmiaow) on

या गाण्याची वाजिद खान यांच्यासोबतच्या रेकॉर्डिंगच्या पहिल्या दिवशीची आठवण ती शेयर करते. याविषयी बोलताना ती सांगते की, वाजिद खान म्हटले होते की, “हे गाणं तूच गाणार. मला हे गाणं तूच गायलेलं हवं आहे.”
 “वाजिद खान यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्याकडून हे गाणं गाऊन घेतलं होतं.” असं यावेळी या व्हिडीओत शाल्मली सांगते.

Recommended

PeepingMoon Exclusive