By  
on  

दीपिका पदुकोणने थ्रोबॅक व्हिडीओ शेयर करत लिहीलं असं कॅप्शन, कार्तिक आर्यनने विचारला त्याचा अर्थ 

सध्या सुरु असलेला लॉकडाउनचा फटका विविध क्षेत्राला बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झाली आहेत. त्यातच सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या मनोरंजन विश्वातील थ्रोबॅक हाही पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ ते सध्या पोस्ट करत आहेत. चाहत्यांनाही त्यांचे हे जुने फोटो, व्हिडीओ पाहायला आवडतयं. सध्या त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनच्या पोस्ट, फोटोशूट्स हे सगळं नसल्याने सध्या घरात असलेल्या गोष्टी आणि जुने फोटो, व्हिडीओ हे कलाकार पोस्ट करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Green Room Shenanigans... #cannes #throwbackthursday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही असाच एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कान फिल्म फेस्टिव्हल दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यावेळी दीपिका तयार होण्याआधीची तिची मस्ती कॅमेऱ्यात कैद करण्यात आली होती. यावेळी बाथरोब घालून डान्स करतानाचा हा दीपिकाचा व्हिडीओ आहे. त्यातच दीपिकाने या व्हिडीओला कॅप्शन लिहीलं आहे की, “ग्रीन रूम शेनानिगन्स”. 
दीपिकाचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहून कार्तिक आर्यनने तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट करत तिलाच शेनानिगन्सचा अर्थ विचारला. मग दीपिकानेही कार्तिकच्या प्रश्नाचं असं उत्तर दिलं आहे. ती म्हणते की, “चित्र-विचित्र वागणं आणि काहीतरी मजेशीर गोष्टी करणे (ज्या बऱ्याचदा तू करतोस)”अशाप्रकारे दीपिकाने कार्तिकला या शब्दाचा अर्थ सांगीतला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

मनोरंजन विश्वातील हे कलाकार सध्या सोशल मिडीयावर जास्त प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा मजेशीर पोस्ट पाहायला मिळत आहेत.
    
 

Recommended

PeepingMoon Exclusive