By  
on  

 सुशांत सिंह राजपूतने बनवली होती त्याची बकेट लिस्ट, 50 विविधं स्वप्नांची बनवली होती यादी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल सकाळी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो नैराश्येमध्ये असल्याचं बोललं जातय. सुशांत अवघ्या 34 वर्षांचा होता. ‘काय पोचे’ या सिनेमातून त्याने बॉलिवुडमध्ये डेब्यू केला होता. ‘छिछोरे’ हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. त्याच्या बांद्र्यामधील राहत्या घरी त्याने कोणतीही सुसाईड नोट न ठेवता आत्महत्या केली आहे.

आपल्या स्वप्नांची देवाणघेवाण करण्यावर तो भर द्यायचा अशाने स्वप्न सत्यात उतरतात असा त्या विश्वास होता. शिवाय सुशांतची त्याची 50 स्वप्न असलेली बकेट लिस्टदेखील होती. याविषयी त्याने सोशल मिडीयावरही पोस्ट केलं होतं. या लिस्टमध्ये उड्डाण परवाना मिळवणं, 100 लहान मुलांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवणे, रोनाल्डोसोबत फुटबॉल खेळणे, भारतात सगळ्यात मोठं ग्रंथालय उभारणे, ज्वालामुखी पाहणे आणि इतर बऱ्याच गोष्टी यात होत्या. ही  स्वप्नांची यादी सोशल मिडीयावर शेयर करण्याचा सुशांतचा हेतू असा होता की त्याच्या फॉलोअर्सनीही त्यांच्या स्वप्नांवर प्रेम करायला शिकायला हवं. शिवाय त्याने एक बुक क्लबही सुरु केलं होतं ज्याचं नाव Intexillectual होतं, जिते तो विज्ञानाच्या माहितीविषयक पुस्तकांची नावं सुचवेल. या लिस्टमधील त्याची काही स्वप्ने पूर्ण झाली आणि काही अपूर्ण राहिली. मात्र या गुणी अभिनेत्याने या स्वप्नांच्या यादीसह जगाचा निरोप घेतला. 

 

सुशांतचा जन्म पटना येथे झाला होता. त्याच्यानंतर त्याला दोन बहिणी वहिल डॉ. के. के. सिंह असा परिवार आहे.  2002 मध्ये सुशांतच्या वयाच्या 16व्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं होतं.
 

Recommended

PeepingMoon Exclusive