By  
on  

अवघ्या 16 वर्षांची टिक-टॉक स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या, रात्री झालं होतं मॅनेजरसोबत बोलणं

मनोरंजन विश्वाला जणू कुणाची नजर लागली की काय असं चित्र पाहायला मिळतय. 2020 हे वर्ष आता कित्येकांना नकोसं वाटतय. हे यासाठी कारण यावर्षी एकामागोमाग एक दु:खद बातमी समोर येत आहेत. यात आत्महत्येच्या बातम्या मोठ्या प्रमाणात आहेत. नुकतच बॉलिवुडचा प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. या उत्तम कलाकाराला गमावल्यानंतर आणखी एक बातमी समोर आली आहे. टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केली आहे. अवघ्या 16 वर्षांच्या सियाने तिचं जीवन संपवलं आहे.

 सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटर यावषियीची माहिती दिली आहे. यात तो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की, “दुखद बातमी, 16 वर्षांची टिक-टॉकर सिया कक्कडने आत्महत्या केली आहे. ही बातमी पब्लिश करण्याआधी मी तिच्या टॅलेंट मॅनेजमेंट एजेंसीचा प्रमुख अर्जून सरीनशी बोललो, ज्याचं काल रात्रीच एका गाण्याविषयी तिच्यासोबत बोलणं झालं होतं. त्याचं असं म्हणणं आहे की ती काल रात्री चांगल्या मूडमध्ये होती. त्यालाही अंदाज नाही की सियाने हे पाऊल का उचचलं. तुम्ही तिचे व्हिडीओ पाहून अंदाज लावू शकता की ती तिच्या कामात किती चांगली होती, हे खरच दुखद आहे की तिने हे पाउल उचचलं. जर तुम्ही डिप्रेस असाल तर असं करू नका. ”
सियाचे सोशल मिडीया अकाउंट पाहिले असता जवळपास 20 ते 21 तासांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओही पोस्ट केला होता, शिवाय टिक-टॉकवरही 21 तासांपूर्वी एक व्हिडीओ तिने पोस्ट केला होता.
  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You cannot change things by loving em harder ;)

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive