By  
on  

धकधक गर्ल शिकली आहे मार्शल आर्ट ? शेयर केली ही जुनी आठवण

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या अदांचे, तिच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याविषयी सगळेच परिचित आहेत. मात्र माधुरीने तिची आणखी एक आवड सगळ्यांसोबत शेयर केली आहे. माधुरीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. 

माधुरी या फोटोमध्ये तिचे पति श्रीराम नेने आणि दोन्ही मुलांसोबत दिसतेय. हा फोटो आहे मार्शल आर्टमधील ताईक्वांडो हा प्रकार शिकतानाचा. काही वर्षांपूर्वीची ही आठवण पोस्ट करून माधुरी लिहीते की, "ऑरेंज बेल्टच्या परिक्षेचा दिवस, बोर्ड तोडणँ आणि ताईक्वांडो परिवारासोबत एकत्र शिकण्याचा अनुभव अप्रतिम होता. ज्यात लक्ष केंद्रित करणे, शिस्त आणि मेहनत आम्ही अनुभवली."

 

काही वर्षांपूर्वी संपूर्ण परिवारासोबत ताईक्वांडो शिकण्याचा अनुभव माधुरीने घेतला होता. त्याची ही खास आठवण आहे. माधुरी सध्या तिच्या गायनकौशल्याकडेही लक्ष देत आहे. नुकताच तिने तिचा कँडल हा सिंगलही लाँच केला होता. माधुरीला विविध कलेची आवड आहे. आणि म्हणूनच तिच्या दोन्ही मुलांनाही तिने म्युझिक शिकण्यासाठी प्राधान्य दिलं.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive