अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा दिवाळीत तर रणवीर सिंहचा ‘83’ येणार याच वर्षी ख्रिसमसला

By  
on  

 कोरोना व्हायरस आणि त्यामुळे झालेलं लॉकडाउन याचा फटका विविध क्षेत्रांना बसला. यातच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. चित्रकरणही बंद झाली, तर सिनेमागृहेही बंद आहेत. यातच चित्रीकरणाचा परिस्थिती पुर्ववत होत आहे. मात्र सिनेमागृहे बंद आहेत. आणि म्हणूनच काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय काही निर्मात्यांनी घेतला.
मात्र यातच रणवीर सिंहचा ‘83’ आणि अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हे दोन मोस्ट अव्हेटेड सिनेमेही ओटीटीवर येणार की काय असा प्रश्न होता. मात्र तसं न होता आता हे दोन सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. पिव्हीआर सिनेमाच्या ऑफिशियल सोशल मिडीया पेजवर याविषयीची माहिती समोर आली आहे. तेव्हा अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा या वर्षी दिवाळीत तर रणवीर सिंहचा ‘83’ हा सिनेमा ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Exciting times ahead.. Gearing up to release Rohit Shetty's Sooryavanshi on Diwali and Kabir Khan's 83 on Christmas this 2020!

A post shared by P V R Cinemas (@pvrcinemas_official) on

बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमाची उत्सुकता देखील सगळ्यांना होती. मात्र हा सिनेमात देखील ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र आता ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ हे दोन्ही सिनेमे सिनेमागृहात प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.
रोहीत शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफही झळकणार आहे. तर कबीर खान यांच्या ‘83’ सिनेमात रणवीर सिंह सह बरेच कलाकार झळकणार आहेत. 1983च्या क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमा रणवीर कपील देव यांच्या भूमिकेत दिसेल तर पत्नि, अभिनेत्री दीपिका पादुकोण या सिनेमात त्याच्या ऑनस्क्रिन पत्निची भूमिका साकारतेय. 
 

Recommended

Loading...
Share