By  
on  

बॉलिवुड स्टार क्रिती सनॉनला 'मिमी' कोस्टार सई ताम्हणकरकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

अभिनेत्री सई ताम्हणकर आगामी हिंदी सिनेमा 'मिमी'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री क्रिती सनॉनसोबत सई या सिनेमात दिसेल. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सई आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आहे. आज क्रितीच्या वाढदिवसानिमित्ताने सईने देखील क्रितीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मिडीयावर क्रितीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सई ताम्हणकरनेही क्रितीसोबतचा फोटो पोस्ट करून तिला विश केलय. सई लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदर मुलगी, खूप प्रेम आणि आनंदमय शुभेच्छा"

 

या सिनेमाच्या सेटवरील क्रिती आणि सईचे काही फोटोही मध्यंतरी चर्चेत आले होते. या सिनेमातील दोघींच्या भूमिका काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 'मला आई व्हायचयं' या मराठी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive