By  
on  

पाहा Video : वाढदिवसाला सैफ अली खानला करीनाकडून मिळालं हे आगळं वेगळं गिफ्ट

अभिनेता सैफ अली खानचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या या 50व्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी करीना कपूर खानने वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं. सोशल मिडीयावर करीना या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत सैफ आणि करीनाचे रोमँटिक क्षणही कैद झाले आहेत.
मात्र करीनाने सोशल मिडीयावर सैफच्या वाढदिवासानिमित्ताने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत सैफचा 50 वर्षांमधील प्रवास पाहायला मिळतोय. सैफच्या जन्मापासून ते त्याच्या लहानपणीचे फोटो ते त्याच्या मुलांसोबतचे फोटो या व्हिडीओत आहेत. शिवाय करीना आणि तैमुर सोबतचे खास क्षणही या व्हिडीओत आहेत. करीनाने स्वत: हा व्हिडीओ बनवल्याचे ती पोस्टमध्ये सांगते.

करिना या पोस्टमध्ये लिहीते की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. सैफच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने मी त्याच्या आयुष्याची 50 वर्षे दाखवणारा व्हिडीओ तयार केला आहे. जो मी काल रात्री त्याच्यासोबत शेयर केला. हा 22 मिनीटांचा मोठा व्हिडीओ होता. आणि मला अजूनही वाटतय की अजून बरच काही त्यात सांगू शकले असते. मी इथे त्याची झलक शेयर करत आहे. व्हिडीओत असलेले 50 फोटो जे हद्यातून आत. वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह.”
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to the sparkle of my life ️

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

Recommended

PeepingMoon Exclusive