By  
on  

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रितेश देशमुख, मिलाप झवेरी यांनी निशिकांत व्हेंटिलेटरवर असल्याचं केलं स्पष्ट

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची अजूनही  चिंताजनक असल्याचं समोर येत आहे. मात्र आज निशिकांत यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मिडीयावर पसरू लागल्या काहींनी तर त्यांना श्रद्धांजली देणाऱ्या पोस्टही सोशल मिडीयावर केल्या. यातच मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांनी या अफवांना दूर केले आहे. लेखक मिलाप झवेरी यांनी सुरुवातीला निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट केली होती. मात्र त्यानंतर माहिती घेऊन कामत हे व्हेंटिलेटवर असल्याचं ट्विट केलं. 

 

अभिनेता रितेश देशमुखनेही निशिकांत कामत हे जिवंत असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचं ट्विट करून स्पष्ट केलं आहे. 

 

काही ठिकाणी निशिकांत कामत यांच्या निधनाच्या बातम्याही पसरल्या. मात्र या अफवांना दूर करण्याचं काम रितेश देशमुख, मिलाप झवेरी आणि संध्या मृदुल या कलाकारांनी केलंं. 

मात्र निशिकांत कामत उपचार घेत असलेल्या हैदराबादमधील एआयजी रुग्णालयानेही स्टेटमेंट प्रदर्शित केलं आहे. ज्यात निशिकांत कामत हे व्हेंटिलेटवर असल्याचं म्हणटलय. स्टेटमेंटमध्ये लिहीलय की, "निशिकांत कामत हे व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत आणि अजूनही गंभीर स्थितीत आहेत."

मृत्यूशी झुंज देत असलेल्या निशिकांत कामत यांच्या निधनाच्या अफवा आणि चुकीच्या बातम्या समोर आल्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे. तर ज्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या पोस्ट केल्या होत्या त्यांनी पोस्ट काढून टाकल्या आहेत.  

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive