By  
on  

उर्मिला-आमिरच्या या सिनेमात हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता सहाय्यक दिग्दर्शक, शेयर केली ही आठवण

राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने या सिनेमाशी जोडले गेलेले कलाकार आणि टीम या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही या सिनेमाच्या आठवणीत खास पोस्ट केली.

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही या सिनेमाविषयीची खास पोस्ट केली आहे. मधुर भांडारकर यांनी रंगीला सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणजेच सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून रंगीला सिनेमाच्या सेटवरील काही आठवणी शेयर केल्या आहेत.

ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "कल्ट क्लासिक रंगीलासाठी राम गोपाल वर्मासोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून भाग झाल्याचा मला आनंद आहे. याच सिनेमाच्या अभूतपूर्व यशाने मला स्वतंत्र फिल्ममेकर बनण्यास प्रोत्साहीत केलं. छान टीमसोबतच्या छान आठवणी."

 या पोस्टमध्ये मधुर भांडारकर यांनी रंगीला सिनेमाच्या सेटवरील काही खास क्षणचित्रे शेयर केली आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive