By  
on  

दिग्दर्शक अनुराग कश्यपचं समर्थन करत अभिनेत्री अमृता सुभाषने सांगतली अनुरागविषयीची ही गोष्ट

नुकतच ‘पटेल की पंजाबी शादी’ फेम अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर याविषयावर पुन्हा ट्विटरवर चर्चा सुरु झाल्या. अनुराग कश्यपनेही एकामागोमाग एक ट्विट करत याविषयी बोलला. मात्र आता त्याच्यावरील या आरोपानंतर अनेक अभिनेत्री अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.

अनेक अभिनेत्रींनी अनुराग कश्यपचं समर्थन करत सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. तापसी पन्नू, सुरवीन चावला सह अनेक अभिनेत्रींनी अनुराग विषयी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत.

 

अभिनेत्री अमृता सुभाषही आता अनुरागचं समर्थन करत आहे. अमृताने नुकतच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. अनुरागसोबतचा फोटो पोस्ट करून अमृताने त्याच्याविषयी असं लिहीलय की,  "तू एक सर्वात प्रामाणिक, प्रेमळ, खरा आणि सत्यवादी व्यक्ती आहेस. तू नेहमीच माझा आणि सेटवरील प्रत्येकाचा आदर केलास. मी हे कधीच शब्दातून मांडलं नाही कारण आपल्या नात्यात त्याची गरज नव्हती. पण आज मला हे बोलायच आहे की, धन्यवाद तुम्ही मला दिलेल्या आदरासाठी."

असं म्हणत अनुराग महिलांचा आणि अभिनेत्रींचा आदर करत असल्याचं अमृता या पोस्टमधून सांगतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive