By  
on  

मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या बायोपिकमध्ये झळकणार सई मांजरेकर, ऑक्टोबर महिन्यात करणार शुटिंग सुरु

पहिल्याच सिनेमात सुपरस्टार सलमान खानसोबत झळकून महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकरचा 'दबंग 3' सिनेमातून जबरदस्त डेब्यू झाला होता. तेव्हा सई आता पुढे कोणत्या सिनेमात झळकेल यासाठी अनेक जण उत्सुक होते. मात्र नुकतच सईने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरून पोस्ट करून तिच्या आगामी सिनेमाविषयीची घोषणा केली आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्यांनी या लढ्यात स्वत:चा जीव गमावला होता ते मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित 'मेजर' ही बायोपिक येत आहे. या बायोपिकमध्ये सई मांजरेकर झळकणार असल्याचं सईने म्हटलं आहे. 

 

सई या पोस्टमध्ये लिहीते की, "बहाद्दर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बायोपिकचा भाग होण्यासाठी मी सन्मानित, नम्र आणि उत्साहित आहे. मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यात अत्यंत शौर्याने लढणाऱ्या एन एस जी कमांंडोवर ही फिल्म आधारित आहे. कास्टसोबत सहभागी होण्यासाठी आणि पुढील महिन्यात शुटिंग करण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाहीय."

पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सई या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तेव्हा सई तिच्या या दुसऱ्या सिनेमात काय कमाल करते हे पाहणं महत्त्वाचं असेल. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये असेल. हा सईचा तेलुगू डेब्यूदेखील म्हणता येईल.

 

प्रसिद्ध साऊथ स्टार महेश बाबू या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तेलुगू स्टार आदिवी सेश या सिनेमात मुख्य भूमिकेत असेल.  सशी किरण टिक्का या फिल्मचे दिग्दर्शन करत आहेत.

मात्र या सिनेमाशिवाय आणखी एका हिंदी सिनेमात सई वरुण तेजसोबत झळकणार असल्याचही बोललं जातय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive