2020 या वर्षात अनेक वाईट आणि चांगल्या गोष्टीदेखील घडल्या. काही कलाकारांसाठी हे वर्ष खास ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण काही सेलिब्रिटींनी याचवर्षी केला त्यांच्या नात्याचा खुलासा. यापैकी काही लव्हबर्ड्स लग्नबंधनात अडकले तर काहींच्या आयुष्यात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. या कलाकारांनी सोशल मिडीयाचा वापर करत त्यांच्या जोडीदाराविषयी सांगितलं.
सोनाली कुलकर्णी – कुणाल बेनोडेकर
अप्सरा सोनालीचे असंख्य चाहते आहेत मात्र एका व्यक्तिने सोनालीचं हदय जिंकलं. जिथे सोनाली लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा यावर्षीही होत्या. त्यात या चर्चांना सोनालीने पूर्णविराम दिलं. सोनालीने तिच्या जोडीदाराची ओळखच सगळ्यांना करुन दिली आणि नात्याचा खुलासा केला. एवढच नाही तर चक्क साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून सोनालीने ती आणि कुणाल एन्गेज असल्याचं सांगितलं. सोशल मिडीयावर सोनाली-कुणालच्या साखरपुड्याचे फोटो चांगलेच चर्चेत आले. सोनालीने याचवर्षी 2 फेब्रुवारीला दुबईत कुणालसोबत साखरपुडा केला होता. मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला.
तर लॉकडाउनच्या काळातही सोनाली दुबईत होती. यावेळी सोनालीने दुबईतच लॉकडाउनचा काळ कुणालसोबत घालवला. अनलॉक झाल्यानंतर कुणाल आणि सोनाली मुंबईत परतले होते. सोशल मिडीयावर सोनालीने कुणालसोबतचे काही फोटोही शेयर केले आहेत. पुढील वर्षी सोनाली आणि कुणाल लग्नबंधनात अडकणार आहेत. कुणाल हा दुबईत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतो. त्यामुळे त्याचं काम हे परदेशात असतं. मागील काही वर्षांपासून सोनाली आणि कुणाल एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीचे अनेक हॅशटॅगही आता चर्चेत आहेत.
मानसी नाईक – प्रदीप खरेरा
उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या वाढदिवसाला ती प्रेमात असल्याचं सोशल मिडीयावर सांगितलं. एवढच नाही तर मानसीने तिच्या जोडीदारासोबतचा फोटो पोस्ट केला आणि तिच्या या खान नात्याचा खुलासा केला. इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेराला मानसी डेट करत असल्याची महिती सगळ्यांपर्यंत पोहोचली. तेव्हा सुरु असलेल्या टिकटॉक ऐपवरही मानसी-प्रदीपचे व्हिडीओ चर्चेत आले. मेड फॉर इच अदर अशी ही जोडी सोशल मिडीयावरही चर्चेत आली.
याचवर्षी नोव्हेंबर महिनत्या मानसी आणि प्रदीपने साखरपुडाही केला. मानसीची जवळची मैत्रीण दिपाली सय्यदही या साखरपुड्याची साक्षिदार ठरली. पुढल्या वर्षी 19 जानेवारी रोजी प्रदीप आणि मानसीचा विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे.
सई लोकूर – तिर्थदीप रॉय
अभिनेत्री सई लोकूरनेही याच वर्षी तिच्या रिलेशनशिपविषयी घोषणा केली. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सई स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर सईचा या शोमधील गेम पाहुन तिचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. सोशल मिडीयावरही सईचा मोठा चाहतावर्ग आहे. आणि याच चाहत्यांसाठी सईने गुड न्यूज दिली. सईने एका व्यक्तिसोबतचा पाठमोरा फोटो शेयर केला होता. मात्र ही व्यक्ती कोण? याविषयीची माहिती मात्र नेटकऱ्यांना नव्हती. याच व्यक्तिच्या प्रेमात असल्याचं सईने सांगितलं. त्यानंतर सईने थेट हातावर मेहंदी रंगलेले फोटो शेयर केले. त्यामुळे नक्की लग्न की साखरपुडा? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यानंतर पुन्हा सईने आणखी एक पाठमोरा फोटो पोस्ट केला. मग त्यानंतर उत्सुकता आणखी न ताणता सईने तिच्या जोडीदारासोबतचे साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिलं. तर सईचा जोडीदार म्हणजेच तिर्थदीप रॉयसोबत सई एन्गेज झाली.
सईने तिर्थदीपची ओळख सगळ्यांसमोर उघड केली. मग सईच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. आणि सईने या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अपडेट्स चाहत्यांना सोशल मिडीयावरून दिले. 30 नोव्हेंबर रोजी बेळगावात सई आणि तिर्थदीप विवाहबंधनात अडकले.
यावर्षी चर्चेत आलेल्या या लव्हबर्ड्सना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पिपींगमूनकडून शुभेच्छा.