दिग्दर्शक: अनुराग सिंह
कलाकार: अक्षय कुमार, परिणीती चोप्रा
वेळ: 2 तास
रेटींग: 4 मून
36 व्या शीख रेजिमेंटचे 12 सप्टेंबर 1897 साली 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आता केसरीच्या निमित्ताने सर्वांसमोर उलगडली जाणार हे आपण सर्वच जाणतो. भारताच्या सुवर्ण इतिहासातील हा काळ सर्वच पिढ्यांना जवळून अनुभवता यावा यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेतलेले हे एक स्तुत्य पाऊलच म्हणता येईल. कारण या युध्दाची आजच्या पिढीला म्हणावी तशी माहिती नाही. अक्षय कुमार यात ईश्वर सिंह हा नायक साकारतोय तर या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याच्या निर्मितीची धुरा सांभाळल्याने सिनेमाबाबतच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या.
अक्षयने या सिनेमात शीख हवालदार ईशरसिंगची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खास घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे, त्यामुळेच ही एक धगधगत्या देशभक्तीची साहसपूर्ण गोष्ट आहे,
कथानक
सारागढी या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. कारण या ठिकाणाचं असलेलं राजकीय महत्त्व. या ठिकाणाहून अफ़ग़ाणी सैनिकांना भारतात प्रवेश करण सहज शक्य व्हायचं. पण शीखांच्या कडव्या प्रतिकाराने हे शक्य झालं नाही. हिच लढाई सारागढीची लढाई म्हणून ओळखलं जातं. हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे.१० हजार अफगाण सैनिकांसोबत २१ सैनिकांनी लढा दिला. हे २१ सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढले त्यांनी अफगाण सैनिकांना कंठस्नान घालण्यात यश मिळवलं.
दिग्दर्शन
भारताच्या इतिहासाचा सुवर्णकाळ पडद्यावर अधोरेखित करण्यात आणि तो जनमानसात मोठ्या पडद्यावर अचूक मांडण्यात दिग्दर्शक अनुराग सिंह यशस्वी ठरले आहेत. मध्ये मध्ये भावूक आणि हास्यास्पद दृश्यांचासुध्दा जबरदस्त ताळमेळ सिनेमा रंजक करण्यासाठी बसवण्यात आला आहे.
अभिनय
सुपरस्टार या सिनेमातला संपूर्ण वावर एखाद्या वाघासारखा असल्याचं जाणवतं. अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडण्याचा त्याचा अट्टाहास प्रत्येक क्षणी लक्षात येतो. दमदार अभिनयातून पुन्हा एकदा अक्षयने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रानेसुध्दा आपल्या भूमिकेद्वारे त्याला योग्य साथ दिली आहे.
सिनेमा का पाहावा?
आजच्या पिढीला ह्या सारागढीच्या अतुलनीय लढ्याचा झंझावात जाणून घेण्याची केसरीच्या निमित्ताने ही सुवर्ण संधीच चालून आलीय, त्यामुळे सर्वांनी सहकुटुंंब हा सिनेमा अजिबातच चुकवू नये.
https://youtu.be/JFP24D15_XM