गौरीवर जीव लावणाऱ्या माईंचा तिला सून म्हणून स्विकारण्यास नकार

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जयदीपने अचानक गौरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि भर मांडवात गौरीसोबत लग्न केलं. हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. पण गौरीला पोटच्या मुलीसारखे वागवणाऱ्या माईंना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. या सगळ्याचा दोष माई आता गौरीला देत आहेत.

आगामी भागात माईंचं कधी न पाहिलेलं रुप पाहायला मिळणार आहेत. गौरीचं जयदीपसोबत लग्न झाल्यानंतर माई गोरीला सून मानण्यास नकार देत आहेत. त्या म्हणतात की त्यांचा जीव जरी गेला तरी त्या गौरीला सून म्हणून स्विकारणार नाही.

 

तेव्हा आत्तापर्यंत गौरीला मायने वागवणाऱ्या माई आता तिच्या विरोधात उभ्या दिसत आहेत. मात्र गौरी माईंच मन जिंकण्यात यशस्वी होतेय का हे या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. जयदीप ने गौरीशी लग्न तर केलय मात्र तो तिला त्याच्या पत्निचा दर्जा देऊ शकेल का यासगळ्या गोष्टींची उत्तरं मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये मिळतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share