पाहा Photos : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर मालिका कलाकारांची धमाल-मस्ती

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या मंचावर दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळतय. दिवाळी विशेष भागात विविध मालिका कलाकार येऊन धमाल मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. दिवाळी विशेष भागात महाराजा प्रदीप सिंग उर्फ बच्चू जोशी यांची हवा येऊ द्या च्या मंचावर एन्ट्री झाली आणि त्यांनी सर्व कलाकारांना बंदी बनवून राजाला हसवण्याचा शिक्षा दिली. हा राजा आता प्रत्येक आठवड्यात प्रत्येक भागात समोरच्या सिंहासनावर बसून कॉमेडीचा आनंद घेईल, आणि दिलखुलास मजा करताना दिसेल.

 ह्या आठवड्यात या मंचावर हजेरी लावली ती 'देवमाणूस' मधील डॉक्टर अजित आणि डिम्पल, 'अग्गंबाई सासूबाई' मधील बबड्या आणि शुभ्रा, 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणा आणि अंजली यांनी. यावेळी महाराजा प्रदीप सिंग उर्फ बच्चू जोशीची खूप मोठी फॅन असलेली ‘अस्मिता देशमुख’ म्हणजेच सर्वांची लाडकी 'देवमाणूस' मधील डिम्पल हिने स्वप्नील जोशी सोबत 'टिक टिक वाजते डोक्यात' ह्या गाण्यावर धमाल डान्स केला.

या पाहुण्यांच्या हजेरीने या कार्यक्रमात अधिक रंगत पाहायला मिळत आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी 'देवमाणूस आणि अग्गबाई सासूबाई' या मालिकांच स्पूफ सादर करून एकचं हास्य धमाका उडवून दिला.

'चला हवा येऊ द्या'च्या नवीन फार्महाऊस मधून एक विमान उडत आहे, ज्यात आपल्या झी मराठीचे कलाकार अडकलेले पाहायला मिळत आहेत.

 

Recommended

Loading...
Share