पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला' मधील जीजाचा हा स्वॅग पाहिला का ?

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत सुरुवातीला राणादाचा स्वॅग पाहायला मिळत होता. मात्र आता जीजा या मालिकेत चांगलीच भाव खाऊन जात आहे. साध्या भोळ्या अंजली बाईच्या जागी आता जीजा प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. तिचा हटके अंदाज चांगलाच लक्षवेधी ठरतोय.

नुकतच अक्षयाने तिचा सेटवरील एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत ती जीजाच्या लुकमध्ये आहे. या व्हिडीओत जीजाचा स्वॅग पाहायला मिळतोय. सुर्यास्त असताना जीजा अचानक अशी काही जादू करते की अंधार होतो. अर्थात हे कॅमेराने ने इफेक्ट देण्यात आलय. पण हा जीजाचा लय भारी स्वॅग तिच्या चाहत्यांना आवडतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अनेक वर्षांपासून 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांचंं मनोरंजन करत आहे. मात्र आता मालिकेला वेगळं वळण दिलं आहे. राणादा प्रमाणेच आता जीजाही सगळ्यांचं लक्ष वेधतेय.

Recommended

Loading...
Share