By  
on  

'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' कलाकारांची 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धमाल

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अनेक कलाकार येत असतात. त्यातच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेचे कलाकारही या विनोदवीरांच्या मंचावर धमाल करताना दिसतात. नुकतच या मंचावर 'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' मालिकेची टीम हजर होती. 

यावेळी या कलाकारांनी मंचावर धमाल केली. सरु आजी आणि टोण्याच्या डान्स परफॉर्मन्सनीही रंगत आणली. तर 'चला हवा येऊ द्या'च्या विनोदवीरांनी  'देवमाणूस' आणि 'कारभारी लयभारी' या मालिकांवर स्पूफ सादर केलं. यावेळ एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. 

या मालिकेतील कलाकारांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स या मंचावर सादर करण्यात आले. यावेळी या मालिकेतील मुख्य कलाकारांनी धमाल उडवुन आणली.


तेव्हा यंदाचा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा भाग मनोरंजनाचा डोस घेऊन येईल यात शंका नाही. लवकरच टेलिव्हिजनवर हे भाग प्रदर्शित करण्यात येतील.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive