आई माझी काळुबाई या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले आहेत. 2020 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. आणि आता या मालिकेने 100 भागांचा टप्पा पार केला आहे. याचनिमित्ताने मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं.
यावेळी मालिकेतील कलाकारांसह मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. केक कापून हे खास सेलिब्रेशन करण्यात आलं.
या खास सेलिब्रेशनचे फोटो या मालिकेतील अभिनेत्री वीणा जगतापने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.
याआधी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेत आर्याच्या भूमिकेत होती. मात्र मालिकेची निर्माती अलका कुबल यांच्यासोबतच्या वादानंतर प्राजक्ताच्या जागी अभिनेत्री वीणा जगतापला घेण्यात आलं.