By  
on  

पाहा Video : अरुंधतीच्या वाढदिवसानिमित्ताने देशमुख कुटुंबाने केली ही गोष्ट, सगळे झाले भावुक

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक भावना पाहायला मिळत आहेत. कधी या मालिकेतील देशमुख कुटुंब सुखात आनंदी असतं तर दुख:त एकमेकांना साथ देताना दिसतं. या कुटुंबासाठी अरुंधतीचं स्थान या घरात महत्त्वाचं आहे. त्यातच अरुंधतीचा वाढदिवस म्हटल्यावर त्यासाठी खास सेलिब्रेशन केलं जातय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांनी मिळून अरुंधतीला खास सरप्राईजही दिलय. तिच्या वाढदिवसानिमित्ताने 44 दिवांनी अरुंधतीला ओवाळण्यात आलं. यावेळी सगळ्या देशमुख कुटुंबातील महिलांनी मिळून अरुंधतीला ओवाळलं. यावेळी काही भावुक क्षण पाहायला मिळाले. हे पाहुन अरुंधतीदेखील भावुक झालेली दिसली. 

सध्या या मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात काय काय घडतय याकडे सगळ्यांचं लक्ष असताना, अरुंधतीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आनंदी क्षण प्रेक्षकांचं मनोरंजन करत असेल यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive