By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' आणि 'देवमाणूस' मालिकेचे महाएपिसोड, खास भागात पाहायला मिळणार हे ट्विस्ट..

17 जानेवारीला प्रेक्षकांना त्यांच्या दोन आवडत्या मालिकेचे महाएपिसोड पाहायला मिळणार आहेत. या दोन मालिका आहेत 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'देवमाणूस'. या मालिकांचे खास सिक्वेन्स या महाएपिसोडच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजीत आसावरीला खास सरप्राईजेस देणार आहे. शिवाय यावेळी देवळात आसावरी आणि आजोबा पहिल्यांदा समोरासमोर येणार आहेत. तेव्हा नेमकं काय होणार हे या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

तर 'देवमाणूस' मालिकेत डॉ. अजितने मंजूच्या जमिनीबद्दल ज्या अफवा पसरवल्या आहेत त्याचा संजूला सुगावा लागल्याचं कळणार आहे. अजित संजूचा खून करून त्याला पुरायला जात असताना तिथे सरु आज्जी येते. सरु आज्जीचं येणं आणि निघून जाणं अजितला संशयास्पद वाटू लगातं. सरु आज्जी सुद्धा वाड्यामागे काहीतरी पुरलं असल्याचं बोलते. आणि हे प्रकरण नंतर पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचतं. अजित हा सरु आज्जीचा काटा काढायचं ठरवतो. 

तेव्हा या दोन मालिकांमध्ये आता नेमकं काय ट्विस्ट पाहायला मिळेल हे पाहणं रंजक ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive