'रंग माझा वेगळा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचलेली पाहायला मिळतय. मात्र सारं काही आलबेल असताना पुन्हा एकदा या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. एकीकडे दीपा आणि सौंदर्या या दोघांमधील नात चांगलं होत असताना आणखी एक अशी गोष्ट घडते ज्याने पुन्हा सौंदर्याचं पूर्वीचं रुप पाहायला मिळतं.
कार्तिकने त्याची आई सौंदर्याला एक गोड बातमी दिली आहे. ही गुड न्यूज म्हणजे दीपाच्या प्रेग्नन्सीची. कार्तिक बाबा होणार हा आनंद त्याला गगनात मावेनासा झाला आहे. हीच गोड बातीमी कार्तिक त्याची आई सौंदर्याला सांगतो. मात्र सौंदर्या आनंदी न होता दीपाचं बाळ दीपासारखचं सावळ्या रंगाचं असेल ही भिती तिला वाटते. आणि ती आनंद व्यक्त न करता ही भिती व्यक्त करते. हे पाहुन कार्तिकही थक्क होतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत हे पाहायला मिळतय. मात्र आता सौंदर्या कार्तिक आणि दीपाने दिलेली ही गोड बातमी स्विकारेल का ? की पुन्हा सावळ्या रंगाचा द्वेष करेल ? हे या मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळेलच.