'रंग माझा वेगळा' या मालिकेत सासूबाई सौंदर्या इनामदार अजूनही सूनबाई दीपाच्या काळ्या रंगाचा द्वेष करताना दिसत आहे. एकीकडे दीपा प्रेग्नेंट असताना तिने गोरंपान बाळाला जन्म द्यावं अशी सौंदर्याची इच्छा आहे. पण न झाल्यास सौंदर्य कोणत पाऊल उचलेल याचीदेखील दीपाला भिती वाटतेय.
यातच आजारी पडलेल्या सौंदर्या इनामदारची दीपाने बरीच काळजी घेतली आहे. त्यामुळे कुणाचे उपकार न ठेवणारी सौंदर्या दीपाला साडी भेट म्हणून देते. मात्र दीपाने तिची एक वेगळीच इच्छा सौंदर्या समोर बोलून दाखवली आहे. सौंदर्याने दीपाला मुलगी म्हणून स्विकारावं आणि त्या साडीने तिची ओटी भरावी असं दीपा सौंदर्याला म्हणते. हे ऐकून सौंंदर्यालाही आश्चर्याचा धक्का बसतो.
तेव्हा सौंदर्या दीपाची ही इच्छा पूर्ण करेल का. काळ्या रंगाच्या द्वेष करणारी सौंदर्या दीपाला आपलसं कधी करेल हे या मालिकेत पाहायला मिळेलच.